News Flash

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

जान्हवी खानविलकर हिने कांस्यपदक मिळविताना ३८० गुणांची कमाई केली.

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्र संघातील खेळाडू. 

महाराष्ट्राने १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या विभागातील सांघिक सुवर्णपदकांसह राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इंदूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या नूपुर हगवणे पाटील हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पीपसाईट रायफलमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. तिने ३९० गुणांची नोंद केली. जान्हवी खानविलकर हिने कांस्यपदक मिळविताना ३८० गुणांची कमाई केली. नूपुर हिने नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धेतही सोनेरी यश मिळविले होते. नूपुर, जान्हवी व साक्षी कुंभार यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने इंदूर येथील स्पर्धेत सांघिक विजेतेपदही मिळविले. महाराष्ट्राची रिसीमा कांडे हिने १७ वर्षांखालील गटात पीपसाईट रायफलमध्ये रौप्यपदक मिळविले. तिला ३९२ गुण मिळाले. तिचे सुवर्णपदक केवळ एक गुणाने हुकले. तिने नंदिता सूळ व मैथिली कोपर्डे यांच्या समवेत सांघिक विभागात कांस्यपदक पटकाविले. १९ वर्षांखालील गटाच्या पीपसाईट रायफलमध्ये महाराष्ट्राच्या प्रगती नाईकरे हिने ३८७ गुणांसह वैयक्तिक गटात कांस्यपदक मिळविले. तिने त्रिशा मुखर्जी व गार्गी शिरसाट यांच्या साथीत महाराष्ट्रास सांघिक सुवर्णपदक मिळवून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 3:19 am

Web Title: maharashtra state gat general trophy
टॅग : Maharashtra,State
Next Stories
1 नव्या विजयाध्यायासाठी जोकोव्हिच सज्ज
2 आर्सेनलची मजबूत पकड
3 पीयूष चावलाची हॅट्ट्रिक; उत्तर प्रदेशची महाराष्ट्रावर मात
Just Now!
X