महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही सुवर्णपदकांची लयलूट करत राज्याला पदकतालिकेत आघाडीवर कायम राखले. शनिवारी महाराष्ट्रच्या  खेळाडूंनी सात सुवर्णपदक जिंकली आणि त्यापैकी चार सुवर्णपदके जलतरणपटूंची पटकावली. मुंबईचा नील रॉय व आणि केनिशा गुप्ता यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या खात्यात १६ सुवर्ण, ११ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण ३९ पदके जमा झाली आहेत. दिल्ली  (४४ पदक) दुसऱ्या स्थानावर आहे.

पदकविजेते खेळाडू

सुवर्णपदक : राकेश गोंड (बांबू उडी), पुष्कर पाटील, सुरज अंकोला, अक्षय गोवर्धन व करण हेगिस्टे (४ बाय १०० मी. रिले), केनिशा गुप्ता (२०० मी. वैयक्तिक मिडले व ५० मी. फ्री स्टाईल), नील रॉय (५० मी. फ्री स्टाईल व २०० मी. वैयक्तिक मिडले), भाग्यश्री फंड (फ्री स्टाईल ५२ किलो)

रौप्यपदक : पार्थ कंधारे (ग्रीको रोमन ५४ किलो), रोहन भोसले (ग्रेको रोमन ४६ किलो), अवंतिका नराळे, आभा साळुंखे, चार्वी पुजारी व प्रतिक्षा सानस (४ बाय १०० मी. रिले), ताई बाम्हणे (४०० मी.)

कांस्यपदक : लक्ष्मण दरवाडा, निरंजन शेटके, विकास खोडके व आर्यन लांडगे (४ बाय ४०० मी. रिले), सोनाली मांडलिक (फ्रीस्टाईल ४६ किलो), हिमानी फडके, अनन्या जोशी, शारोन शाजू व निष्ठा अगरवाल (४ बाय १०० मी. मिडले रिले).