नवी दिल्ली येथे २८ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन संघांबरोबरच महिला संघही जाहीर करण्यात आला.
लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या संघांची निवड करण्यात आली. या चाचणीत १२५ मल्लांनी भाग घेतला. निवड समितीत सर्जेराव शिंदे, काका पवार, प्रा. दिनेश गुंड व संदीप भोंडवे यांचा समावेश होता.

महाराष्ट्र संघ –
पुरुष : फ्रीस्टाईल- ५० किलो-ज्योतिबा अटकळे, ६१ किलो – उत्कर्ष काळे, ६५ किलो – सूरज कोकाटे, ७० किलो – रणजित नलावडे, ७४ किला -चंद्रशेखर पाटील, ८६ किलो- अनिल जाधव, ९७ किलो- राहुल खाणेकर, १२५ किलो- विक्रांत जाधव. ग्रीकोरोमन -५९ किलो- विक्रम कुऱ्हाडे, ६६ किलो- प्रीतम खोत, ७१ किलो- वसंत सरवदे, ७५ किलो- समीर पाटील, ८० किलो-योगेश शिंदे, ८५ किलो- अभिषेक फुगे, ९८ किलो- शैलेश शेळके, १३० किलो-महेश मोहोळ.
महिला : ४८ किलो- स्वाती शिंदे, ५३ किलो- नंदिनी साळुंखे, ५५ किलो- प्रियंका येरुडकर, ५८ किलो-माधुरी घराळ, ६० किलो- कोमल गोळे, ६३ किलो- रेश्मा माने, ६९ किलो- मनीषा दिवेकर, ७५ किलो-प्रियंका बोकेफोडे.
मार्गदर्शक-दादा लवटे, शिवशंकर बावळे, मोहन खोपडे. व्यवस्थापक-रवि पाटील. तांत्रिक अधिकारी-विलास कथुरे, प्रा.दिनेश गुंड, विकास पाटील, नवनाथ ढमाळ.