19 September 2020

News Flash

हजारे चषक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची कर्नाटकविरुद्ध कसोटी

महाराष्ट्र संघ विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे.

| February 24, 2018 05:07 am

त्रिपाठी, नायर

अष्टपैलू व सातत्यपूर्ण कामगिरीचा प्रत्यय घडवणारा महाराष्ट्र संघ विजय हजारे चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्यासाठी त्यांना बलाढय़ कर्नाटकच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना येथील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर शनिवारी होणार आहे.

महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईवर सात विकेट राखून मात केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव हा सध्या दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाकडून खेळत आहे. त्याच्या अनुपस्थितीतही महाराष्ट्राने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख यांनी फलंदाजीत भरपूर धावा जमविल्या आहेत. गोलंदाजीत त्यांची मदार प्रामुख्याने प्रदीप दाढे, प्रशांत कोरे, निकित धुमाळ यांच्यावर आहे.

कर्नाटक संघात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असल्यामुळे त्यांचा संघ वरचढ मानला जात आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्या मयांक अगरवाल व रवीकुमार समर्थ यांनी झंझावाती शतके झळकावत संघाला जवळजवळ साडेतीनशे धावांपर्यंत नेले होते. तेथेच त्यांचा विजय निश्चित झाला होता. या सामन्यात त्यांनी हैदराबादला १०३ धावांनी हरवले होते. कर्णधार करुण नायर, सी. एम. गौतम यांच्याकडूनही त्यांना चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत श्रेयस गोपाळ व स्टुअर्ट बिन्नी यांनी या मोसमात प्रभावी कामगिरी केली आहे. श्रीनाथ अरविंद, पवन देशपांडे यांच्यावरही त्यांची भिस्त आहे.

वेळ : सकाळी ९ वा. पासून.

संघ

कर्नाटक : करुण नायर (कर्णधार), मयांक अगरवाल, रवीकुमार समर्थ, पवन देशपांडे, स्टुअर्ट बिन्नी, सी.एम.गौतम (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाळ, श्रीनाथ अरविंद, टी.प्रदीप, प्रासिद कृष्णा, देवदत्त पाडिकल, जगदीश सुचित, बी.आर.शरद, रोहित मोरे.

महाराष्ट्र : राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रीकांत मुंढे, अंकित बावणे, नौशाद शेख, निखिल नाईक (यष्टीरक्षक), दिव्यांग हिंगणेकर, अनुपम संकलेचा, सत्यजित बच्छाव, प्रशांत कोरे, प्रदीप दाढे, निकित धुमाळ, अथर्व काळे, शमसुद्दिन काझी, विजय झोल, जय पांडे, मुर्तुझा ट्रंकवाला, सिद्धेश वारघंटे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 5:07 am

Web Title: maharashtra to face favourite karnataka in vijay hazare trophy
Next Stories
1 दिवस-रात्र कसोटीवरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीमध्ये वाद
2 ट्वेन्टी-२०शिवाय क्रिकेट टिकणे कठीण -गांगुली
3 सागर मोरेची अंतिम फेरीत धडक; सानिकेत राऊत चीतपट
Just Now!
X