29 September 2020

News Flash

‘खेलो इंडिया’तील सुवर्णपदक विजेते होणार ‘लखपती’

'खेलो इंडिया युथ गेम्स २०१९' मधील विजेत्यांचा सन्मान; क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची माहिती

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’ मध्ये २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले. खेळाडूंची गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने सुवर्णपदक विजेत्यांना एक लाख रूपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार तर कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी घोषणा आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली.

‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’ नुकतेच यशस्वीरित्या पुण्यात पार पडले. राष्ट्रस्तरीय या गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ८१ कांस्यपदके मिळाली. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा आज झाला. यावेळी विनोद तावडे यांनी माहिती दिली.

राज्यातील उत्तोमोत्तम खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत विनोद तावडे म्हणाले की या विजयानंतर खेळाडूंची जबाबदारी आणखीनच वाढली असून सर्वांच्या अपेक्षाही खेळाडूंकडून वाढल्या आहेत. आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता ठेवावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी केले.

शालेय शिक्षण घेत असताना या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ स्थापन केले असून खेळांचा सराव करत असताना खेळाडूंना आपले शिक्षणही पूर्ण करता येणार आहे व दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की भविष्यात खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत आणि उद्योन्मुख खेळाडू देशाला मिळाले यासाठी तालुका स्तरावर खेळणा-यां विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पाच गुण, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे १०, १५, आणि २० गुण प्रदान करण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या खेळाडूंसाठी शासकीत सेवेत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे. आंतरराष्‌ट्रीय स्तरावर विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचेही तावडे म्हणाले.

यावेळी तावडे यांनी खेलो इंडिया मधील विजेते खेळाडू/प्रशिक्षक व पालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि खेळाडूंच्या तसेच प्रशिक्षकांच्या समस्यांना सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईल, असेही स्पष्ट केले.

विजेत्या ठरलेल्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक, वेटलिफ्टींग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक, शुटींग, फुटबॉल, हॉकी, खे-खे, जलतरण, बॉक्सींग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, आर्चरी अश १८ खेळांचा समावेश होता. या क्रिडा स्पर्धा १७ व २१ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजीत करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्याच्या पथकामध्ये ७२२ खेळाडू व १५६ क्रिडा मार्गदर्शकांनी सहभाग घेतला होता.

केंद्र व राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे व मुंबई येथे ८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले या स्पर्धेत देशातून ७५०० खेळाडू, १५०० तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक, संयोजन समिती, वैद्यकीय व सुरक्षा इ. साठी सुमारे १००० अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते. खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा बाबी- जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, शुटींग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, जलतरण, बॉक्सींग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॅालीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, आर्चरी अशा १८ खेळांच्या क्रीडा स्पर्धा १७ ते २१ वर्षाखालील मुले व मुली यांच्या आयोजित करण्यात आले होते. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकामध्ये ७७२ खेळाडू व १५६ क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापक व चिफ दि मिशन असे एकूण ९२८ सहभागी झालेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 7:01 pm

Web Title: maharashtra to give 1 lakh rupees to gold medalists in khelo india
Next Stories
1 IND vs NZ : रोहित, विराटचं दुर्दैवी ‘न्यूझीलंड कनेक्शन’
2 IND vs NZ : भारतावर टीका करणाऱ्या वॉनचे नेटिझन्सकडून ‘दात घशात’
3 IND vs NZ : चौथ्या सामन्यातील पराभव आमच्यासाठी डोळे उघडणारा – भुवनेश्वर कुमार
Just Now!
X