News Flash

रणजी क्रिकेट स्पर्धा पहिल्याच दिवशी महाराष्ट्र, मुंबई व विदर्भाकडून निराशा

महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तिन्ही संघांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली असली तरी पहिल्या दिवशी या तिन्ही संघांनी सपशेल निराशा केली.

| February 17, 2015 12:02 pm

महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ या तिन्ही संघांनी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली असली तरी पहिल्या दिवशी या तिन्ही संघांनी सपशेल निराशा केली.  
*  लाहली : आंध्र प्रदेशच्या शिवकुमार याने ४१ धावांमध्ये सहा बळी घेत महाराष्ट्राला ९१ धावांमध्ये गुंडाळले. पहिल्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने पहिल्या डावात ३ बाद ८७ धावा केल्या आहेत.
*  कटक : दिल्लीने मुंबईचा पहिला डाव १५६ धावांत गुंडाळला. मुंबईच्या निखिल पाटीलने झुंजार नाबाद ५४ धावा केल्या. दिल्लीकडून सुमीत नरवालने तीन बळी घेतले असून त्यांची दिवस अखेर १ बाद २० अशी स्थिती आहे.
*  जयपूर : मुरली विजय (९६) व विजय शंकर (नाबाद ९०) यांनी केलेल्या दमदार खेळामुळेच तामिळनाडूने विदर्भविरुद्ध पहिल्या डावात ४ बाद २३४ धावांची मजल गाठली.
*  इंदूर : रॉबिन उथप्पा (१५३) व लोकेश राहुल (९१) यांच्या आक्रमक १९४ धावांच्या भागीदारीमुळेच कर्नाटकने आसामविरुद्ध पहिल्या डावात २ बाद ३०२ धावांपर्यंत मजल गाठली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 12:02 pm

Web Title: maharashtra vidarbha and mumbai disappointed on the first day ranji trophy cricket tournament
Next Stories
1 झुरीच क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा : आरोनियनवरील विजयासह आनंदला संयुक्त आघाडी
2 आयरिश विजयगाथा!
3 BLOG : सहाही मुंड्या चित!
Just Now!
X