25 January 2021

News Flash

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा

सायली केरिपाळेकडे संघाचं नेतृत्व

११ ते १४ जुलै दरम्यान बिहारमधील पाटणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सिन्नर-नाशिक येथे झालेल्या ६६ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून अंतिम संघाची निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या सायली केरीपाळेकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. अंतिम १२ खेळाडूंमध्ये राज्य अजिंक्यपद विजेते पुणे संघाच्या ५ खेळाडूंची निवड झाली आहे. तर उपविजेते मुंबई उपनगरच्या २ खेळाडूंची निवड झाली आहे. ठाणे, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी १ खेळाडु अंतिम १२ मध्ये स्थान मिळाले आहे.

महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार व संघ व्यवस्थापक म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनिषा गावंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाणून घ्या अंतिम १२ जणांचा संघ –

अर्चना करडे (ठाणे), श्रद्धा पवार (रत्नागिरी), दीपिका जोसेफ (पुणे), अंकिता जगताप (पुणे), स्नेहल शिंदे (पुणे), सायली केरिपाळे (कर्णधार, पुणे), आप्रमाली गलांडे (पुणे), कोमल देवकर (मुंबई उपनगर), सोनाली हेळवी (सातारा), पूजा यादव (मुंबई शहर), ज्योती पवार (नाशिक), सायली नागवेकर (मुंबई उपनगर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 5:42 pm

Web Title: maharashtra womens kabaddi team declarer for national games in bihar psd91
Next Stories
1 …तर उपांत्य फेरीत भारतीय संघ पुन्हा भगव्या जर्सीमध्ये दिसणार!
2 बीसीसीआयकडून स्थानिक क्रिकेटचं वेळापत्रक जाहीर
3 पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त, महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला भारत अ संघात स्थान
Just Now!
X