राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा
मुकुंद धस
महाराष्ट्राच्या पुरुषांनी संघर्षपूर्ण लढतीत जम्मू-काश्मीरचा ७३-५१ असा पराभव करून भावनगर येथे शनिवारपासून सुरू झालेल्या ६९व्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पूर्वार्धात अडखळत खेळणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाने शेवटच्या सत्रात आपला खेळ उंचावला आणि आपल्या अभियानाची यशस्वी सुरुवात केली.
कर्णधार सिद्धांत शिंदे, अश्रफ आणि फरदीन आक्रमणात फारसे प्रभावी ठरले नसताना अजिंक्य माने आणि शुभम यादवने गुणफलक हलता ठेवण्याची जबाबदारी पार पाडली. आता हरयाणाविरुद्ध रविवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात महाराष्ट्राला विजय मिळविण्यासाठी नियोजनपूर्व खेळ करण्याची आवश्यकता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 6, 2019 1:47 am