ओम युवा स्पोर्ट्स क्लब आयोजित आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व मुंबई उपनगर खो-खो संघटना मान्यताप्राप्त जोड जिल्हा निमंत्रित पुरुष व महिला खो-खो स्पध्रेत मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीच्या दोन्ही संघांनी अंतिम विजेतेपद पटकावले.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी अकादमीने १८-१० अशा फरकाने  श्री समर्थ व्यायाम मंदिरचे आव्हान परतवून लावले. महात्माच्या दीपेश मोरे (२.३० मि., १.४० मि. व ४ बळी), दीपक माधव (२.५० मि., २.१० मि. व २ बळी), अनिकेत पोटे (४ बळी) व चेतन गवस (५ बळी) यांनी आपल्या चतुरस्र खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर कुरघोडी केली.  कविता गोलांबडे (४ मि. व ३ मि.), प्रियांका तेरवणकर (३.१० मि. व २.४० मि.),अक्षता कदम (२.२० मि. नाबाद व २ बळी) व जयश्री नवरत (३ बळी) यांच्या अष्टपलू खेळाच्या जोरावर महात्मा गांधी अकादमीने शिवनेरी सेवा मंडळाचे आव्हान  ७-६ असे एका गुणाने व ४.४० मिनिटे शिल्लक राखून परतवले.

वैयक्तिक पारितोषिके

अष्टपल खेळाडू : दीपेश मोरे (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी); कविता गोलांबडे (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी)

सर्वोत्कृष्ट संरक्षक : दीपक माधव (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी); प्रियांका तेरवणकर (महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी)

सर्वोत्कृष्ट आक्रमक : सिद्धिक भगत (श्री समर्थ व्यायाम मंदिर ); अमृता भगत (शिवनेरी सेवा मंडळ)