भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानासह जाहिरात क्षेत्रही तितकेच गाजवले आहे.
‘पेप्सी’च्या जाहिरातीत रजनीकांतच्या स्टाईलने धोनीने सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले होते. त्यानंतर कॅप्टनकूल धोनी आता एका दुचाकी कंपनीच्या जाहिरातीत सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभू देवा यांच्यासोबत ‘लूंगी डान्स’ या गाण्यावर ताल धरताना दिसणार आहे.
धोनीची हेअर स्टाईल देखील नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे. नुकतीच धोनीने आपली हेअर स्टाईल पुन्हा एकदा बदलली. धोनीच्या या नव्या हेअर स्टाईलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या धोनी ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर असून भारतीय संघ तिथे पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे.