News Flash

VIDEO: विराट कोहलीच्या आधी घेतला धोनीनेच रिव्ह्यूचा निर्णय

'धोनीने त्याच्या कारकीर्दीत घेतलेले ९५ टक्के रिव्ह्यूचे निर्णय बरोबर ठरले आहेत'

पंच नंदन यांनी मॉर्गनची विकेट नाकारल्यानंंतर धोनीने क्षणार्धात रिव्ह्यूचा निर्णय घेतला

तब्बल १० वर्षे मैदानावर कर्णधार म्हणून वावरल्यानंतर पूर्ण संघासाठी निर्णय घेण्याची सवय अंगी लागतेच. पुण्यातील गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यूचा (डिसीजन रिव्ह्यू सिस्टम) निर्णय कर्णधार विराट कोहलीच्या अगोदर घेऊन हेच सिद्ध केले.

इऑन मॉर्गन हा खेळत होता. एक बॉल येऊन त्याच्या बॅटला चाटून गेला. हा झेल आहे आणि मॉर्गन बाद झाला आहे या बद्दल धोनीला आत्मविश्वास होता. त्याने पंचाकडे पाहिले. परंतु पंचाने मॉर्गन बाद झाल्याचा निर्णय दिला नाही.
तेव्हा तात्काळ महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर कर्णधार विराट कोहलीने पुढच्याच क्षणाला दुजोरा दिला. जेव्हा धोनी आणि विराट एकमेकांजवळ आले तेव्हा विराटने धोनीकडे पाहिले तो धोनीला या विकेटबद्दल आत्मविश्वास असल्याचे त्याच्या लक्षात आले.

रिव्ह्यूमध्ये पंच नंदन यांचा निर्णय बदलण्यात आला आणि २६ बॉलमध्ये २८ धावा करणाऱ्या मॉर्गनला तंबूमध्ये परतावे लागले. पत्रकार परिषदेमध्ये देखील या रिव्ह्यूची चर्चा झाली. कर्णधाराऐवजी विकेट कीपरने आधी निर्णय घेतला याबदद्ल विराट कोहलीला विचारणा करण्यात आली. तेव्हा विराट कोहलीने महेंद्र सिंह धोनीवर विश्वास दर्शवला. आपण याबाबतची आकडेवारी पाहिले असल्याचे विराटने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. धोनीने जेव्हा – जेव्हा रिव्ह्यूचा निर्णय घेतला आहे ते जास्तीत जास्त वेळा अचूक ठरले आहेत असे विराटने म्हटले. धोनीने त्याच्या कारकीर्दीत घेतलेले ९५ टक्के रिव्ह्यूचे निर्णय बरोबर ठरले आहेत असे विराटने म्हटले. महेंद्र सिंह धोनीचा याबाबतचा अनुभव प्रर्दीर्घ आहे तसेच जेव्हा तो यष्टीमागे असतो, तेव्हा तो येणाऱ्या प्रत्येक बॉलबदद्ल सजग असतो त्यामुळेच धोनीने घेतला निर्णय हा माझ्यासाठी अंतिमच होता असे विराटने स्पष्ट केले. जेव्हा मला धोनी सांगतो बॉल हा लाइनच्या बाहेर आहे किंवा आत आहे तेव्हा त्यावर वाद घालण्याचा माझ्यासाठी प्रश्नच उद्भवत नाही असे विराटने म्हटले. धोनी हा अतिशय चाणाक्ष खेळाडू आहे. डीआरआसच्या बाबतीत मी त्याच्या निर्णयावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो असे देखील विराटने म्हटले. धोनीच्या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या रिव्ह्यूची क्लिप खूप वेळ शेअर करण्यात आली आहे. विराटने कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्याच मॅचमध्ये शतक करुन सर्वांची मने जिंकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 12:04 pm

Web Title: mahendra singh dhoni drs virat kohli india vs england eon morgan
Next Stories
1 विराटसेनेचा धमाकेदार विजय
2 अल्फोन्सेचा अनपेक्षित विजय
3 डोंगरातील सरावामुळे मुंबईतल्या अडथळ्यांवर मात!
Just Now!
X