News Flash

धोनी विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर

ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर सर्वाधिक फलंदाजांना तंबूत पाठवले

100 यष्टीचीत करुन धोनीने संगकाराच विक्रम मोडला

भारतीय संघाचा चपळ यष्टीरक्षक, महेंद्रसिंह धोनीने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यष्टीमागील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. फिरकीपटू युजेंद्र चहलच्या गोलंदाजीवर दनुष्काला सुरेख यष्टीचीत करत धोनीने संगकाराच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. धोनीच्या कारकीर्दीतील हे ९९ वे यष्टीचीत ठरले. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ९९ फलंदाजांना यष्टीचीत केले होते.

धोनीने आतापर्यंतच्या कारकीर्दीत ऑफ स्पिनरच्या गोलंदाजीवर सर्वाधिक फलंदाजांना बाद केले आहे. यात श्रीलंकेविरुद्ध त्याने २१ वेळा आपल्यातील चपळता दाखवून दिली. धोनी आणि कुमार संगकारा यांच्यानंतर श्रीलंकेचा कालूवितरणाने ७५ फलंदाजांना यष्टीचीत केले असून, तो तिसऱ्या स्थानावर आहे. तर ७३ फलंदाजांना यष्टीचीत करुन पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक मोईन खान चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा अ‍ॅडम गिलख्रिस्ट या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ५५ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. त्याच्यानंतर भारताचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगियाचा समावेश आहे. भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करताना मोंगियाने ४४ फलंदाजांना बाद केले आहे. संगकारासह अन्य पाच यष्टीरक्षकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आणखी एक यष्टीचीत करुन धोनी एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या सलामीने चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर मध्यफळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. कठीण परिस्थितीत धोनीने पुन्हा एकदा खंबीर खेळी केली. भुवनेश्वर कुमारसह त्याने भारताला विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 3:44 pm

Web Title: mahendra singh dhoni equals kumar sangakkara 99 stumping record odi
Next Stories
1 भारताच्या ६ फलंदाजांना गारद करणारा धनंजय २४ तासांपूर्वीच अडकला होता लग्नाच्या बेडीत
2 सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
3 संजीवनी जाधवला रौप्यपदक
Just Now!
X