News Flash

क्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर ‘येथे’ही धोनीच अव्वल…

केवळ क्रिकेटच्या मैदानातच अव्वल नसून वैयक्तिक जीवनातही अव्वल असल्याचे धोनीने सिद्ध केले आहे.

महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा कायम आपल्या शांत आणि संयमी वर्तणुकीसाठी प्रसिद्ध आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याने अनेक मोठमोठे पराक्रम गाजवले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला धोनीची गणना भारतातीलच नव्हे तर जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूमध्ये केली जाते. मात्र आपण केवळ क्रिकेटच्या मैदानातच अव्वल नसून वैयक्तिक जीवनातही आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे.

आयकर विभागाच्या अधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी याने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १२.१७ कोटी रुपये कर भरला आहे. याबरोबरच बिहार आणि झारखंड या विभागात मिळून यंदाच्या आर्थिक वर्षात धोनी हा वैयक्तिक स्तरावर सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती ठरला आहे. आयकर खात्याच्या बिहार आणि झारखंड या विभागाच्या संयुक्त आयुक्त निशा सिंघमार यांनी ही माहिती दिली. २०१६-१७ या आर्थिक वर्षात धोनीने १०.९३ कोटी इतका कर भरला होता. त्यात वाढ झाली असून यंदा त्याने १२.१७ कोटी रुपये कर भरला आहे.

२०१६मध्ये धोनीने कर्णधारपद सोडले. मात्र अजूनही बीसीसीयाच्या अ दर्जाच्या खेळाडूंमध्ये तो करारबद्ध आहे. याशिवाय स्वतःच्या मालिकेचे काही व्यवसाय, काही व्यावसायिक जाहिराती आणि तत्सम माध्यमातूनही धोनीला उत्त्पन्न मिळते. २०१३-१४ या आर्थिक वर्षापर्यंत धोनी या विभागात सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2018 12:01 am

Web Title: mahendra singh dhoni income tax highest bihar and jharkhand region
Next Stories
1 कुलदीप यादवच्या पाठिवर सचिन तेंडुलकरचा हात
2 भारताच्या सहा फलंदाजांची इंग्लंडमधली सरासरी, सगळ्यात तळाला विराट
3 एकदिवसीय क्रिकेटमधले पाच धोकादायक सलामीचे फलंदाज
Just Now!
X