धोनी हा माझ्यासाठीही प्रेरणास्थानच -मनप्रीत सिंग

‘‘भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अतिशय संयमी व जिगरबाज खेळाडू आहे. माझ्यासाठीही तो प्रेरणास्थान असून त्याची मालकी असलेल्या रांची रेज संघाकडून मी हॉकी इंडिया लीगमध्ये खेळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मनप्रीत सिंगने सांगितले.

chennai super kings vs kolkata knight riders match preview
IPL 2024 : विजयी पुनरागमनासाठी चेन्नई सुपर किंग्ज उत्सुक! आज अपराजित कोलकाताचे आव्हान; कर्णधारांच्या कामगिरीकडे लक्ष 
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार
kl rahul
विजयाचे खाते उघडण्यास लखनऊ उत्सुक! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
kumar pillai establish new gang after controversy with chhota rajan
अधोविश्व : कुमार पिल्लई, छोटा राजनशी वाद आणि नवी टोळी

धोनीकडून मिळणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे कौतुक करताना मनप्रीत म्हणाला, ‘‘सामन्यात कितीही दडपण आले किंवा आव्हान मोठे असले तरी शांतचित्ताने व आत्मविश्वासाने कसे खेळायचे, हे आम्ही त्याच्याकडून शिकलो आहे. कासवाच्या गतीने यश मिळवण्याचेच आमचे ध्येय असते. आमच्या संघाचा कर्णधार अ‍ॅश्ले जॅक्सन हादेखील क्रिकेटचा चाहता असून त्यालाही धोनीच्या संयमी वृत्तीचे खूप कौतुक वाटत असते. धोनी ज्याप्रमाणे संघातील खेळाडूंमध्ये चांगला समन्वय ठेवण्याबाबत हुकमी कर्णधार मानला जातो, त्याप्रमाणेच अ‍ॅश्ले हादेखील उत्तम कर्णधार आहे. जरी आम्ही गोल स्वीकारले तरी त्याबद्दल कोणताही त्रागा न करता पराभवाच्या छायेतून कसा विजय मिळवता येईल, याचा अ‍ॅश्ले सतत विचार करीत असतो.’’

‘‘धोनी हा नेहमी आमच्या संघाचे प्रशिक्षक हरेंदरसिंग यांच्याशी चर्चा करीत असतो व आमच्या कामगिरीचा आढावा घेतो. संघातील प्रत्येक खेळाडूने क्षमतेच्या शंभर टक्के कामगिरी करावी अशीच धोनी याची अपेक्षा असते व तो ही अपेक्षा हरेंदरसिंग यांच्याजवळ बोलून दाखवतो व हरेंदरसिंग हा उपदेश आमच्यापर्यंत पोहोचवतात,’’ असे मनप्रीतने सांगितले. रांची संघाचा हॉकी इंडिया लीगमधील पहिला सामना २१ जानेवारी रोजी मुंबई येथे दबंग मुंबई संघाबरोबर होणार आहे.

मंगळवारी भारत संघाचा इंग्लंडविरुद्ध सराव सामना; युवराज, नेहरा, धवन पुनरागमनासाठी सज्ज

मुंबई : जवळपास एक दशक भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नावापुढे कर्णधार हे विशेषण मंगळणारी अखेरची सोबत करणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात धोनी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

याचप्रमाणे भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या युवराज सिंगच्या कामगिरीकडे या सराव सामन्यात सर्वाचे लक्ष असेल. जूनमध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर युवराजला संघात स्थान देण्यात आले आहे. याचप्रमाणे डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराचे कौशल्यसुद्धा या सामन्यात पाहायला मिळेल. शस्त्रक्रियेनंतर तो भारतीय संघात परतला आहे. याशिवाय सलामीवीर शिखर धवनच्या कामगिरीकडेसुद्धा सर्वाचे लक्ष असेल. बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रणजी क्रिकेटमध्ये तो खेळला होता.

ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळल्यावर धोनी ७०हून अधिक दिवसांच्या विश्रांतीनंतर प्रथमच व्यावसायिक क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटकडे जाताना हा सराव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. मात्र झारखंडच्या रणजी संघासोबत त्याने नियमित सराव या कालावधीत केला आहे. कसोटी मालिकेत ०-४ असा मानहानीकारक पराभव पत्करणारा इंग्लंडचा संघ नाताळच्या सुटीनंतर मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी पुन्हा भारतात आला आहे. त्यांच्या कसोटी संघातील नऊ खेळाडू सहा मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीही खेळत आहेत. महत्त्वाचा फलंदाज जो रूटचा या संघात समावेश नाही. तो १२ जानेवारीला संघात सामील होणार आहे.