भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांनी करोनावर मात केली आहे. करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात आठवडाभर उपचार केल्यानंतर त्यांनी करोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

२० एप्रिलला धोनीच्या आई वडिलांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच त्यांचं ऑक्सिजन लेवलही व्यवस्थित आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचाइसी त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून होती.

करोनामुळे टी २० मुंबई लीग पुढे ढकलली

मागच्या आठवड्यात आर. अश्विनच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाल्याने त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. तर करोनाच्या भीतीने काही परदेशी खेळाडूही मायदेशी परतले आहेत. मागील काही दिवसांमध्ये भारतामध्ये सातत्याने कोरना रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमधील सर्व आठ संघांसाठी बायो बबलचे कठोर नियम करण्यात आले असून त्याचं पालन करणं हे बंधनकारक आहे.

“…म्हणून मी मदत करण्याचा निर्णय घेतला”; कमिन्सकडून SRK आणि KKR कनेक्शनसंदर्भात खुलासा

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ चांगली कामगिरी करत आहे. चेन्नईने आतापर्यंत ५ सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आयपीएल गुणतालिकेत धोनीचा संघ अव्वल स्थानी आहे.