News Flash

जाहिरातींमुळे धोनी अडचणीत, हायकोर्टाची नोटीस

१३ सप्टेंबररोजी पुढील सुनावणी

महेंद्रसिंह धोनी ( संग्रहीत छायाचित्र )

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उत्पादनांची जाहिरात करणे महेंद्रसिंह धोनीला महागात पडले आहे. दिल्ली हायकोर्टाने याप्रकरणात धोनीला नोटीस बजावली असून याप्रकरणी आता १३ सप्टेंबररोजी पुढील सुनावणी होणार आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी फिट ७ आणि स्पोर्ट्सफिट या दोन्ही ब्रँडच्या जाहिराती करतो. स्पोर्ट्स वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (एसडब्ल्यूपीएल) या कंपनीत ३३ टक्के शेअर्सचे मालक असलेल्या विकास अरोरा यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जिम आणि फिटनेसशी संबंधीत उत्पादनांच्या जाहिराती धोनी फक्त त्यांच्याच कंपनीसाठी करु शकतो. पण धोनीने नियमांचे उल्लंघन करत प्रतिस्पर्धी कंपनी म्हणजेच फिट-७ साठी जाहिरात केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

हायकोर्टात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी धोनीला नोटीला नोटीस बजावत भूमिका मांडण्याचे आदेश दिले. याशिवाय फिट-७ आणि एसडब्ल्यूपीएलच्या संचालक मंडळालाही हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. एसडब्ल्यूपीएलने मात्र ही याचिका चुकीच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. नियमांचे उल्लंघन होत असले तरी संचालकांनी धोनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला नाही. कंपनीत धोनीने २२ कोटी रुपये गुंतवले असून गुंतवलेली रक्कम परत मिळाल्यावर धोनीने कंपनीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सध्या प्रक्रिया सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धोनीने काही दिवसांपूर्वी नवीन क्षेत्रात पाऊल टाकले होते. ‘सेव्हन’ या नावाने महेंद्रसिंह धोनीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज बाजारात आणली होती. रांचीमध्ये धोनीच्या पहिल्या वहिल्या दुकानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. नवीन दुकानाचा फोटो धोनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. एप्रिलमध्ये महेंद्रसिंह धोनीला धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात दिलासा मिळाला होता. मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेल्या वादग्रस्त जाहिरातीवरुन धोनीविरोधात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात दाखल झालेली याचिका सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 5:12 pm

Web Title: mahendra singh dhoni receives legal notice from delhi high court for endorsing two competing fitness chains
Next Stories
1 बुद्धिबळ खेळणं पाप आहे, असं करु नकोस! चाहत्यांकडून कैफचं ट्रोलिंग
2 कर्णधार विराट कोहलीच्या नोकरीवर गदा येणार?
3 Ind vs Sri Lanka 1st Test Day 4 Updates : गॉल कसोटीत भारताचा झेंडा, मालिकेत १-० ने आघाडी
Just Now!
X