News Flash

भारतरत्न पुरस्कार सर्वप्रथम ध्यानचंद यांना मिळायला हवा होता!

‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार क्रीडापटू म्हणून हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वप्रथम मिळायला हवा होता,

| January 12, 2015 12:57 pm

‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार क्रीडापटू म्हणून हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वप्रथम मिळायला हवा होता, असे मत भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले.
‘‘ध्यानचंद हे भारतरत्न पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती होते. सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला हे एक प्रकारे चांगले झाले. कारण क्रीडापटूला या पुरस्काराचे दार त्यामुळे खुले झाले. परंतु या पुरस्काराचा सर्वप्रथम मान हा ध्यानचंद यांचा होता,’’ असे मिल्खा सिंग यांनी सांगितले.
१९६०मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत ४०० मीटर शर्यतीत मिल्खा सिंग यांना चौथा क्रमांक मिळाला होता. ८० वर्षीय मिल्खा सिंग यांनी सायना नेहवालच्या पद्मभूषण पुरस्काराबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘सायनाच्या कर्तृत्वाचा विचार करता, तो पुरस्कार तिला मिळायला हवा. परंतु तुम्ही स्वत:लाच पुरस्कार मिळण्यासाठी सांगता, तेव्हा ते चुकीचे ठरते!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2015 12:57 pm

Web Title: major dhyan chand should have got bharat ratna says milkha singh
टॅग : Milkha Singh
Next Stories
1 चेन्नई खुली टेनिस स्पर्धा : वॉवरिन्का अजिंक्य
2 न्यूझीलंडचा श्रीलंके वर विजय
3 ‘स्टुअर्ट बिन्नी विश्वचषकात टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल’
Just Now!
X