News Flash

मलेशियाने भारताला २-२ने बरोबरीत रोखले

शेवटची ४० सेकंद बाकी असताना झालेल्या गोलाच्या जोरावर मलेशियाने भारतास २-२ असे बरोबरीत रोखले, त्यामुळे अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीची संधी भारताने गमावली.

| March 17, 2013 03:00 am

शेवटची ४० सेकंद बाकी असताना झालेल्या गोलाच्या जोरावर मलेशियाने भारतास २-२ असे बरोबरीत रोखले, त्यामुळे अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीची संधी भारताने गमावली. फैजल सरी याने दोन्ही गोल करीत मलेशियाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत पाचव्या मिनिटाला मलेशियाने पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करीत झकास सुरुवात केली. त्यांचा हा गोल फैजल सरी याने केला. १९व्या मिनिटाला मनदीप सिंग याने अमित रोहिदासच्या पासवर गोल करीत भारताचे खाते उघडले व १-१ अशी बरोबरी साधली. ४८व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रुपींदरपाल सिंग याने गोल करीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ४० सेकंद बाकी असताना मलेशियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर फैजलने गोल करत २-२ अशी बरोबरी साधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 3:00 am

Web Title: malaysia hold india equally by 2 2
टॅग : Hockey,Sports
Next Stories
1 मँचेस्टर सिटीवर एव्हरटनचा विजय
2 फिर वहीं कहानी..
3 वॉटसनचे बंड झाले थंड!
Just Now!
X