News Flash

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : सायना नेहवाल उपांत्य फेरीत, ओकुहारावर मात

उपांत्य फेरीत सायनाचा सामना कॅरोलिना मरीनशी होणार

(संग्रहित छायाचित्र)

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स चषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने महिला एकेरीत जपानच्या नोझुमी ओकुहारवर मात करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सायनाचा सामना कॅरोलिना मरीनशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाने नोझुमी ओकुहारचा 21-18, 23-21 असा पराभव केला आहे.

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटनमध्ये सायनाला सातवे मानांकन देण्यात आले आहे. सायनाला हा सामना जिंकण्यास ४८ मिनिटांचा अवधी लागला.  जगात नवव्या क्रमांकावर असलेल्या सायनाने ओकुहाराविरोधात खेळलेल्या १३ सामन्यातला हा नववा विजय आहे. गतवर्षी डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनमध्येही ओकुहाराला पराभूत केले होते.  उपांत्या फेरीत सायनाचा सामना चौथ्या मानांकन प्राप्त स्पेनच्या कॅरोलिना मारिनशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 4:22 pm

Web Title: malaysia masters saina nehwal beats nozomi okuhara in quarters to take on carolina marin in semi finals
Next Stories
1 IND vs AUS : शास्त्री गुरुजींना मागे टाकत युझवेंद्र चहल ठरला सर्वोत्तम
2 VIDEO : दिल दिया गल्ला म्हणत मांजरेकरांचं संगीतमय समालोचन
3 Video : हा झेल पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, हा भूवी का युवी ?
Just Now!
X