30 September 2020

News Flash

मलिंगाचे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन

गोलंदाजीची अनोखी शैली आणि अचूक यॉर्करसाठी ओळखला जाणारा गोलंदाज

दुखापतीमुळे मलिंगाला सामन्यांना मुकावे लागले होते.

द.आफ्रिकेच्या भूमीत पहिली वहिली ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाचा दौऱयासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार असून १७ फेब्रुवारी रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळविण्यात येणार आहे. तर पुढील दोन सामने व्हिक्टोरिया आणि अॅडलेडवर अनुक्रमे १९ व २२ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. द.आफ्रिका दौऱयातील फॉर्म श्रीलंकेच्या संघाने कामय ठेवला तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीत देखील ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची संधी श्रीलंकेला आहे. त्यात संघात लसिथ मलिंगाचे पुनरागमन झाल्याने संघासाठी जमेची बाजू आहे. गोलंदाजीची अनोखी शैली आणि अचूक यॉर्करसाठी ओळखला जाणाऱया श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे.

अँजेलो मॅथ्युज दुखापतग्रस्त असल्याने संघाची धुरा उपूल थरंगा याच्याकडे देण्यात आली आहे. दुखापतीमुळे मलिंगाला सामन्यांना मुकावे लागले होते. अखेर दुखापतीवर मात करून मलिंगा आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मलिंगासोबतच कपुगेदरा सुद्धा श्रीलंकेच्या संघात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयात संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्त्व मलिंगा सांभाळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर फिरकीची बाजू चायनामन गोलंदाज लक्षन सांभाळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:32 pm

Web Title: malinga return to sri lanka t20i squad for australia tour
Next Stories
1 कर्करोगग्रस्त माजी बॉक्सरला गौतम गंभीरचा मदतीचा हात
2 स्टार्कच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघाचा जालीम उपाय..
3 ‘हिट मॅन इज बॅक’, दुखापतीवर मात करून रोहित शर्माची सरावाला सुरूवात
Just Now!
X