25 April 2019

News Flash

मलिंगाचे श्रीलंका संघात पुनरागमन

३५ वर्षीय मलिंगा दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

(संग्रहित छायाचित्र)

यॉर्कर विशेषज्ञ म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली आहे. ३५ वर्षीय मलिंगा दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताविरुद्ध त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

श्रीलंकेचा संघ : अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, कुशल मेंडिस, उपुल थरंगा, दिनेश चंडिमल, दनुष्का गुणथिलका, थिसारा परेरा, दसून शनका, धनंजया डी सिल्व्हा, अकिला धनंजया, दिलरुवान परेरा, अमिला अपोन्सो, कासुन रजिथा, सुरंगा लकमल, दुशमंता चमीरा आणि लसिथ मलिंगा.

First Published on September 2, 2018 3:10 am

Web Title: malinga returns to sri lanka team