08 July 2020

News Flash

मलिंगाचा सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम

कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने रविवारी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदवला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मलिंगाने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडीत काढला. २०११मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणारा मलिंगा जुलै महिन्यात कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने पहिल्याच षटकात कॉलिन मुन्रोचा त्रिफळा उडवून आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मग कॉलिन डी ग्रँडहोमला (४४) बाद करीत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावे केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 12:56 am

Web Title: malingas highest wicket world record abn 97
Next Stories
1 निर्भेळ यश भारताच्या दृष्टिपथात
2 दुखापतींवर मात करीत सेरेनाची आगेकूच
3 सायना, सौरभ यांच्यावर भारताच्या आव्हानाची धुरा
Just Now!
X