|| धनंजय रिसोडकर

जपानला २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये अस्सल भारतीय क्रीडा प्रकार मानल्या जाणाऱ्या मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातून अव्वल २४ मल्लखांबपटूंचे पथक जपानला जाऊन जगभरातील क्रीडाप्रेमींसमोर मल्लखांबच्या चित्तथरारक कसरती सादर करणार आहे.

Washim, manuscript Writer, Stabbed, Death, Karanja, Tehsil Office,
दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

जगातील विविध देशांमध्ये नावलौकिक होऊ लागलेल्या अस्सल भारतीय मोजक्या खेळांपैकी एक म्हणून मल्लखांबची ख्याती होऊ लागली आहे. अत्यल्प वेळेत शरीराला सर्वाधिक व्यायाम घडवणारा क्रीडा प्रकार म्हणून मल्लखांब जगभरात उदयाला येत आहे. अशा या मल्लखांबच्या अस्सल देशी आणि महाराष्ट्रात उगम पावल्याचे मानले जात असलेल्या मराठमोळ्या खेळाला आता थोडे बरे दिवस येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुमारे आठ फूट उंचीचा, काहीसा मानवाकृती, गुळगुळीत आणि वरील भागात निमुळता होत जाणारा लाकडी मल्लखांब हा मूळ प्रकार मानला जातो. सर्वात उत्तम मानला जाणारा शिसवीच्या लाकडाचा मल्लखांब हा जमिनीच्या आत सुमारे दोन फूट खाली गाडलेला असतो. अशा या मल्लखांबला आंतरराष्ट्रीय मंचावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. त्यातून मल्लखांबचा जगभरात अधिकाधिक वेगाने प्रसार होणेदेखील शक्य होणार आहे.

महाराष्ट्रातील खेळाडूंना संधी

महाराष्ट्रात जिथे-जिथे मल्लखांबचा खेळ खेळला जातो, तेथील सर्वाधिक कौशल्यवान खेळाडूंचा या पथकात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत आपले मल्लखांब कौशल्य दाखवण्याची संधी मल्लखांबपटूंना मिळू शकणार आहे.   – प्रभाकर वैद्य, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

३० जणांच्या पथकाला मान्यता

जपानमधील ऑलिम्पिकमध्ये प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी जाणाऱ्या पथकात २४ मुले आणि मुली तसेच सहा प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्राच्या क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून पुढील कागदोपत्री औपचारिक पूर्तता करण्यात येत आहे.  – रमेश इंदोलिया, भारतीय मल्लखांब संघटनेचेअध्यक्ष

मल्लखांबवरील प्रमुख कसरती

मल्लखांबावरील कसरतीचे १५ वर्ग सांगितले जातात. त्यात अढी, तेढी, बगली, दसरंग, फिरकी, सुईदोरा, वेल, उतरती, झाप, फरारे, आसने, आरोहण-उडय़ा, अवरोहण, ताजवे, सलामी यांचा समावेश केला जातो. या कसरती शिकून त्यावर चांगली पकड मिळवलेल्यासच परिपूर्ण मल्लखांबपटू मानले जाते.

इतिहासाच्या पुस्तकात मल्लखांबचा समावेश

समर्थ अभ्यासक आणि इतिहास संशोधक मनीषा बाठे यांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सर्व पुराव्यांसहित प्रकाशित केलेल्या ‘एक होता बाळंभट’ या पुस्तकाचा संदर्भ घेत इतिहासाच्या दहावीच्या पुस्तकात मल्लखांबच्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे. मल्लखांबचे संशोधन करणाऱ्या बाळंभटदादा देवधर यांच्या संक्षिप्त माहितीचादेखील त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देशभरातील सहा प्रमुख भाषांच्या सर्व पुस्तकांमध्ये मल्लखांबच्या या माहितीचा सचित्र उल्लेख करण्यात आलेला आहे.

मल्लखांबाचे अन्य प्रकार

तिसरा प्रकार टांगत्या मल्लखांबाचा. पुरलेल्या मल्लखांबाच्या अध्र्या उंचीचा, तसाच दिसणारा लाकडी खांब वरून टांगलेला असतो. तो झुलता असल्याने स्वत:भोवती गोल फिरतो व लंबकाप्रमाणे आडवाही हलतो. त्यावर कसरत करणे आव्हानात्मक असते. पलिते मल्लखांब म्हणजेच एकपादशिरासन हे तिन्ही प्रकार स्पर्धात्मक मल्लखांबाचे आहेत. त्याव्यतिरिक्त काचेच्या बाटल्यांवर ठेवून केलेला बाटली मल्लखांब, शरीराभोवती शॉट लावून केलेला हत्यारी मल्लखांब, दोन्ही हातात जळत्या मशाली घेऊन केलेला पलिते मल्लखांब हे मल्लखांबाचे अन्य प्रात्यक्षिकात्मक प्रकार संभवतात.