पुढच्या दोन मोसमांसाठी मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीगमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मँचेस्टर सिटी इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील प्रसिद्ध फुटबॉल क्लब आहे. युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोशिएशनकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब पुढच्या दोन मोसमात चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

आर्थिक नियमांचे उल्लंघन आणि युरोपियन फुटबॉल संचालन मंडळाची दिशाभूल केल्याप्रकरणी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोशिएशनकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मँचेस्टर सिटी क्लब ३० मिलीयन युरोपचा दंडही ठोठावण्यात आला आहे.  मँचेस्टर सिटीला या बंदी प्रकरणी क्रीडा लवादाकडे दाद मागणार आहे.