News Flash

मँचेस्टर सिटी उपान्त्यपूर्व फेरीत

मँचेस्टर सिटी क्लबने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली.

मँचेस्टर सिटी क्लबने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली. त्यांनी डायनामा किव्ह संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. हा सामना व्हिन्सेंट कोम्पानी व निकोलस ओटामेंडी यांच्या दुखापतीमुळेच गाजला. कोम्पानी व ओटामेंडी या दोन्ही खेळाडूंना पूर्वार्धातच दुखापतीला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांच्या बचाव फळीपुढे समस्या निर्माण झाल्या. तथापि या संघाने या सामन्यातील वेळ निभावून नेला. मँचेस्टर संघाचे प्रशिक्षक मॅन्युअल पेलीग्रिनी यांनी सांगितले, आमचे दोन खेळाडू जखमी झाल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र उपान्त्यपूर्व फेरीतील प्रवेश हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2016 2:27 am

Web Title: manchester city reaches first champions league quarterfinal
टॅग : Manchester City
Next Stories
1 जागतिक इन्डोअर मैदानी स्पर्धेवर उत्तेजक सेवनाचे सावट
2 पाकिस्तानचा बांगलादेशवर दणदणीत विजय
3 राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या
Just Now!
X