News Flash

मँचेस्टर सिटीचे युनायटेडवर वर्चस्व

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन बलाढय़ संघांमध्ये मंगळवारी रात्री रंगलेल्या मुकाबल्यात मँचेस्टर सिटीने इडिन झेकोच्या दोन गोलांच्या बळावर कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडवर ३-० असे वर्चस्व गाजवले.

| March 27, 2014 06:54 am

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन बलाढय़ संघांमध्ये मंगळवारी रात्री रंगलेल्या मुकाबल्यात मँचेस्टर सिटीने इडिन झेकोच्या दोन गोलांच्या बळावर कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडवर ३-० असे वर्चस्व गाजवले. या विजयामुळे मँचेस्टर सिटीने अव्वल क्रमांकावर असलेल्या चेल्सीला गाठण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. पण इडिन झेकोने पहिल्याच मिनिटाला गोल करून मँचेस्टर सिटीला आघाडीवर आणले होते. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच झेकोने आणखी एक गोल लगावत मँचेस्टर सिटीची आघाडी २-० अशी वाढवली. अखेरच्या मिनिटाला याया टौरे याने तिसऱ्या गोलाची भर घालत सिटीच्या विजयावर मोहोर उमटवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:54 am

Web Title: manchester united 0 3 manchester city moyes men outclassed as city keep up title hunt
टॅग : Manchester City
Next Stories
1 मलेशियन ग्रां. प्रि. शर्यतीवर दु:खाचे सावट
2 तन्वी, सौरभची आगेकूच अरुंधती, सायलीचे आव्हान संपुष्टात
3 भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी ज्यूड फेलिक्स
Just Now!
X