मँचेस्टर युनायटेड हा संघ फुटबॉल क्लब इतिहासातील सर्वात नामांकीत संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. ओले गुन्नर सोल्सजार मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचे नवे व्यवस्थापक झाले आहेत. याआधी ते नॉर्वे नॅशनल फुटबॉल संघाचे मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

४८ वर्षीय ओले गुन्नर सोल्सजार १९९६ ते २००७ दरम्यान इंग्लिश प्रिमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबचा खेळाडू म्हणून खेळत होते. या संघाकडून खेळताना त्यांनी २३५ सामन्यांत ९१ गोल मारले आहेत. आज ११ वर्षानंतर पुन्हा एकदा ते मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये परतले आहेत.

लहानपणापासूनच त्यांना प्रशिक्षक म्हणून नाव कमवायचे होते. प्रशिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली आणि ते मँचेस्टर युनायटेड संघाचे मॅनेजर झाले आहेत. याआधी त्यांनी Molde, Cardiff City, व Norway national football फुटबॉल संघांचे मॅनेजर म्हणून काम केले आहे. मँचेस्टर युनायटेड फुटबॉल संघाचा मॅनेजर झाल्याचा मला अभिमान वाटत आहे. मी माझा संघाला आणखी उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करेन अशी व्यवस्थापक बनल्यानंतर ओले गुन्नर सोल्सजार यांनी या भावना व्यक्त केल्या.