News Flash

युरोपा लीग: पोग्बामुळे मँचेस्टर युनायटेडचा विजय

आर्सेनालची पराभवानंतरही उपांत्यपूर्व फेरीत धडक

सबस्टिट्युट खेळाडू पॉल पोग्बाच्या एकमात्र गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने ए.सी. मिलानचा 1-0 असा पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने युरोपा लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. दुखापतीतून सावरत पोग्बा नुकताच संघात परतला आहे.

 

या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार सुरुवात केली. दोन्ही संघाचा बचाव इतका सुरक्षित होता, की पहिल्या सत्रापर्यंत सामना गोलरिहत राहिला. दुसऱ्या सत्रात मात्र चित्र पालटले. मँचेस्टर युनायटेडकडून पोग्बाने 48व्या मिनिटाला गोल करुन संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर एसी मिलाननेही बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते यशस्वी होऊ शकला नाही. निर्धारित वेळेपर्यंत गोल न करता आल्याने एसी मिलानला सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली.

आर्सेनालची पराभवानंतरही उपांत्यपूर्व फेरीत धडक

दरम्यान, दुसर्‍या सामन्यात आर्सेनलचा ओलंपियाकोसकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही आर्सेनलनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. यापूर्वी, घरच्या मैदानावर खेळताना आर्सेनालने 3-1 असा विजय मिळवला होता.

 

ऑलिम्पियाकोसच्या युसूफ अल-अरबीने 51व्या मिनिटाला गोल करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. आर्सेनलनेही बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. ओलंपियाकोसने शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 1:23 pm

Web Title: manchester united beats ac milan to reach the quarterfinals of the europa league adn 96
Next Stories
1 आशिया चषकासाठी भारत करणार पाकिस्तान दौरा?
2 IND vs ENG: विकेटवरुन वाद झाल्यानंतर पहिल्यांदाच सूर्यकुमार झाला व्यक्त; म्हणाला…
3 “माझ्या वर्ल्ड कपच्या संघात याची जागा पक्की”, सूर्यकुमारच्या फलंदाजीवर ‘सिक्सर किंग’ झाला फिदा