News Flash

आर्सेनल अव्वल स्थानावर

आर्सेनलने गुणतालिकेत ३९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

| December 30, 2015 04:58 am

आर्सेनल अव्वल स्थानावर
गोल झाल्यावर आनंद व्यक्त करताना मेसूट ओझीलसह आर्सेनलचे खेळाडू

मँचेस्टर युनायटेडने चेल्सीला गोलशून्य बरोबरीत रोखले

गॅब्रीएल पॉलिस्टा आणि मेसूट ओझील यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर आर्सेनल क्लबने २-० अशा फरकाने एएफसी बोर्नमाऊथ संघावर विजय मिळवत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत अव्वल स्थानावर झेप घेतली. दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडने चेल्सीबरोबरचा सामना गोलशून्य बरोबरीत सोडवला असल्याने निराशाजनक कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरत असलेले मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

आर्सेनलने २७व्या मिनिटाला पॉलिस्टाच्या गोलवर १-० अशी आघाडी घेत अव्वल स्थानाच्या दिशेने पाऊल पुढे टाकले. लंडनमधील एमिरेट्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आर्सेनलचे पारडे जड होते, परंतु एएफसीनेही कडवा संघर्ष दाखवला. त्यामुळेच पहिल्या सत्रात आर्सेनलला १-० अशा आघाडीवर समाधान मानावे लागले. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र ६३व्या मिनिटाला ओझीलच्या गोलने एएफसीला हतबल केले. आर्सेनलने २-० अशी आघाडी अखेपर्यंत कायम राखून विजय निश्चित केला. या विजयाबरोबर आर्सेनलने गुणतालिकेत ३९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. लेईस्टर  (३८)दुसऱ्या स्थानावर आहे.

मँचेस्टर युनायटेडच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे चेल्सीविरुद्धच्या सामन्याला चांगली रंगत आणली होती. चेल्सी आणि युनायटेड दोन्ही संघ कामगिरीशी झगडत असल्यामुळे या लढतीत विजयासाठी जोर लावणार हे निश्चित होते. त्याचा परिणाम सामना गोलशून्य राहिला. या निकालामुळे संघाचा फायदा झाला नसला तरी युनायटेडचे प्रशिक्षक व्हॅन गाल यांना झाला. गेल्या आठ सामन्यांत युनायटेडला एकही विजय मिळवता आलेला नाही आणि त्यामुळे गाल यांच्या पदावर निलंबनाची टांगती तलवार लटकत होती. चेल्सीविरुद्धच्या निकालाने तूर्तास तरी त्यांना दिलासा मिळाला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2015 4:58 am

Web Title: manchester united draw match with chelse
टॅग : Match
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाला विजयी आघाडी
2 इंग्लंड – द. आफ्रिका कसोटी रंगतदार अवस्थेत
3 संमिश्र कामगिरी
Just Now!
X