News Flash

मँचेस्टर युनायटेडची घसरण सुरूच

दरम्यान संघाच्या सुमार कामगिरीमुळे प्रशिक्षक व्हॅन गाल यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत.

स्टोक सिटीविरुद्ध पराभव

लुइस व्हॅन गाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मँचेस्टर युनायटेडची पराभवाची मालिका सुरुच राहिली. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या लढतीत स्टोक सिटीने युनायटेडवर २-० असा विजय मिळवला.

बोजान क्रकिक आणि मार्को अरुनोटोव्हिक यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर स्टोक सिटीने विजय साकारला. व्हॅन गाल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळताना सलग सात पराभवांमुळे चॅम्पियन्स लीग स्पर्धेतून मँचेस्टर युनायटेडची गच्छंती झाली. स्टोक सिटीविरुद्धच्या पराभवामुळे मँचेस्टर युनायटेडची गुणतालिकेत सहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

दरम्यान संघाच्या सुमार कामगिरीमुळे प्रशिक्षक व्हॅन गाल यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 1:34 am

Web Title: manchester united lose match against stroke
टॅग : Match
Next Stories
1 रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय सामनाधिकाऱ्यांची निवड
2 मालिका विजयाचा ऑस्ट्रेलियाचा निर्धार
3 फिफाचे माजी उपाध्यक्ष फिगरेडो उरुग्वेच्या स्वाधीन
Just Now!
X