22 November 2017

News Flash

इंग्लिश प्रीमिअर लीग : मँचेस्टर युनायटेड अव्वल स्थानी

रॉबिन व्हॅन पर्सीने पहिल्याच मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने वेस्ट हॅम युनायटेडचा १-० असा

वृत्तसंस्था, लंडन | Updated: November 29, 2012 7:21 AM

रॉबिन व्हॅन पर्सीने पहिल्याच मिनिटाला केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने वेस्ट हॅम युनायटेडचा १-० असा पराभव केला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या गुणतालिकेत ३३ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे. व्हॅन पर्सीचा हा या मोसमातील १२वा तर या स्पर्धेतील नववा गोल ठरला. अन्य सामन्यांत, मँचेस्टर सिटीने विगान अॅथलेटिकचे आव्हान २-० असे परतवून लावत दुसरे स्थान कायम राखले आहे. चेल्सीला फुलहॅमविरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागल्यामुळे त्यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. टॉटनहॅमने लिव्हरपूलवर २-१ असा तर स्वानसी सिटीने वेस्ट ब्रूमविच अल्बियानवर ३-१ असा विजय मिळवला.

First Published on November 29, 2012 7:21 am

Web Title: manchester united on top of epl