09 March 2021

News Flash

भारतीय हॉकीपटू मनदीप सिंहलाही करोनाची लागण

आतापर्यंत भारताचे ६ हॉकीपटू करोनाग्रस्त

भारतीय हॉकी संघाचा युवा खेळाडू मनदीप सिंहचा करोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. Sports Authority of India म्हणजेच ‘साई’ने यासंदर्भात एक पत्रक काढून माहिती दिली आहे. भारतीय हॉकीपटू सध्या ‘साई’च्या बंगळुरुच्या नॅशन कँपमध्ये सराव करत आहेत. करोनाची लागण झालेला मनदीप भारताचा सहावा हॉकीपटू ठरला आहे.

मनदीप व्यतिरीक्त कर्णधार मनप्रित सिंह, बचावपटू सुरेंद्र कुमार, जसकरण सिंह, ड्रॅग फ्लिकर वरुण कुमार आणि गोलकिपर क्रिशन बहादुर पाठक यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सध्या सर्व खेळाडूंवर ‘साई’च्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सर्व खेळाडूंमध्ये करोनाची सध्या सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भारताचे हॉकीपटू करोनावर मात करुन पुन्हा मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 2:42 pm

Web Title: mandeep singh becomes sixth hockey player to test positive for covid 19 psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 IPL 2021 साठी BCCI खेळाडूंचा लिलाव स्थगित करण्याची शक्यता
2 IPL 2020 स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पतंजलीची उडी
3 शोएब अख्तर B ग्रेड अभिनेता ! जेव्हा मॅथ्यू हेडन शोएबचा स्लेजिंगचा प्रयत्न फोल ठरवतो
Just Now!
X