दक्षिण आफ्रिका अ संघाच्या आगामी भारत दौऱ्यासाठी, बीसीसीआयने नुकतीच भारत अ संघाची घोषणा केली आहे. ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे विभागून कर्णधारपद देण्यात आलेलं आहे. २९ ऑगस्टपासून तिरुअनंतपूरम येथे या मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारत अ संघाकडून विंडीज दौऱ्यात चांगली कामगिरी केलेल्या शुभमन गिलला संघात स्थान देण्यात आलं आहे. याचसोबत विजय शंकर, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, नितीश राणा यांनीही संघात स्थान मिळवलं आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही पहिल्या ३ सामन्यांसाठी भारत अ संघाकडून खेळणार आहे.

पहिल्या ३ वन-डे सामन्यांसाठी भारत अ संघ –

मनिष पांडे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, इशान किशन (यष्टीरक्षक), विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दिपक चहर, खलिल अहमद, नितीश राणा

अखेरच्या २ वन-डे सामन्यांसाठी भारत अ संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), शुभमन गिल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंह, रिकी भुई, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, इशान पोरेल