03 December 2020

News Flash

Asian Champions Trophy : श्रीजेशऐवजी मनप्रीत सिंहकडे हॉकी संघाचं कर्णधारपद

ओमानमध्ये रंगणार स्पर्धा

मनप्रीत सिंह (संग्रहीत छायाचित्र)

१८ ऑक्टोबरपासून ओमान येथे खेळवण्यात येणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचं नेतृत्व मधल्या फळीतला खेळाडू मनप्रीत सिंहकडे सोपवण्यात आलेलं आहे. या स्पर्धेत श्रीजेशच्या खांद्यावर कर्णधारपदाचा भार नसणार आहे. १८ सदस्यीस संघात चिंगलीन साना या तरुण खेळाडूला संघाचं उप-कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे.

भारत या स्पर्धेचा माजी विजेता असल्यामुळे भारतीय संघाकडून मोठ्या आशा बाळगल्या जात आहेत. मात्र आशियाई खेळांमध्ये भारताचं हुकलेलं सुवर्णपदक पाहता भारत कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हलकं लेखण्याची चूक करणार नाही. त्यातच नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा असेल भारताचा हॉकी संघ –

गोलकिपर – पी. आर. श्रीजेश, क्रिशन बहादूर पाठक

बचावफळी – हरमनप्रीत सिंह, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंदर कुमार, जरमनप्रीत सिंह, हार्दिक सिंह

मधळी फळी – मनप्रीत सिंह (कर्णधार), सुमीत, निलकांत शर्मा, ललित कुमार उपाध्याय, चिंगलीन साना (उप-कर्णधार)

आघाडीची फळी – आकाशदीप सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 6:34 pm

Web Title: manpreet replaces sreejesh as captain for asian champions trophy
Next Stories
1 प्रो-कबड्डीत सहाव्या हंगामासाठी जोगिंदर नरवाल दबंग दिल्लीचा कर्णधार
2 मराठमोळ्या गिरीश मारुती एर्नाककडे पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व
3 Asia Cup 2018 : …म्हणून पंचांच्या निर्णयावर व्यक्त व्हायचं टाळलं – महेंद्रसिंह धोनी
Just Now!
X