भारताच्या मनू अत्री व अश्विनी पोनप्पा यांनी न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्रदुहेरीमध्ये मुख्य फेरीत स्थान मिळवले. त्यांनी न्यूझीलंडच्या निकोली टॅगल व डेबोराह यिन यांच्यावर २१-१०, २१-११ अशी मात केली.
मनु व अश्विनी यांच्याविरुद्ध पहिल्या फेरीतील लढतीत ख्रिस्तोफर स्टीघ्स व एरेना काल्डेर हॉकिन्स यांनी माघार घेतली होती. मुख्य फेरीत मनु व अश्विनी यांना ऑस्ट्रेलियाच्या रॉबिन मिडलटोन व लिएनी चुओ यांच्याशी गाठ पडणार आहे. एन. सिक्की रेड्डी व प्रणव चोप्रा यांना ऑस्ट्रेलियाच्या जोनाथन सुआन व जेनिफर तेम यांच्याशी खेळावे लागणार आहे. पुरुषांच्या दुहेरीत मनू सुमीत रेड्डी याच्या साथीने खेळणार आहे.