अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ६० व्या वर्षी मॅरेडोना यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांचा अपघात झाला होता, ज्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यशस्वी शस्त्रक्रीयेनंतर मॅरेडोना आपल्या मुलीच्या घरी परतले होते. सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मॅरेडोना यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला धक्का बसला आहे.

सध्याचा आघाडीचा फुटबॉलपटू ख्रिस्तीआनो रोनाल्डोही मॅरेडोना यांच्या निधनामुळे भावूक झाला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर मॅरेडोना यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत रोनाल्डोने, आज मी माझ्या एका चांगल्या मित्राला अखेरचा रामराम करतोय. ते फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक होते. खऱ्या अर्थाने जादूगार…ते आपल्याला लवकर सोडून जात आहेत पण त्यांच्या मागे त्यांचा खेळ कायम लक्षात राहिल…अशा आशयाचा संदेश रोनाल्डोने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहीला आहे.

आणखी वाचा- …आणि मॅरेडोना यांचा तो गोल ‘Hands of God’ म्हणून प्रसिद्ध झाला

आणखी वाचा- ‘एक दिवस आम्ही दोघं वर एकत्र फुटबॉल खेळू’, मॅरेडोना यांच्या निधनानंतर पेले यांची भावनिक प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता…ज्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रीयाही झाली. यामधून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरात हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. यानंतर अवघ्या काही दिवसांनी मॅरेडोना यांनी अखेरचा श्वास घेतला.