सांगली जिल्ह्यातील ढवळी गावात क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली. रविवारच्या दिवशी क्रिकेट खेळताना सरपंच अतुल पाटील यांना मैदानातच हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. यात विशेष बाब म्हणजे ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल हे उमेदवार होते. १८ जानेवारीला ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन् त्यात अतुल यांच्या पॅनलने वर्चस्व राखलं. परंतु हे यश अनुभवण्यासाठी अतुल साऱ्यांच्यात नव्हते. या हृदयद्रावक घटनेने गावातील त्यांच्या मित्र परिवाराच्या डोळ्यात अश्रू तरळले.

मराठमोळ्या शार्दुलच्या ‘त्या’ कृतीचा प्रत्येक भारतीयाला वाटतोय अभिमान

अतुल हे यंदाच्या निवडणुकीत उभे होते. निकाल समोर आला तेव्हा त्यांनी ३३ मते घेऊन सहज विजय मिळवला. तसेच ज्या पॅनेलकडून अतुल निवडणुकीत उभे राहिले होते, त्या पॅनेलनेदेखील ढवळी ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व मिळवलं. पण हे यश पाहण्यासाठी अतुल हेच या जगात नसल्याने सगळं वातावरण अगदी शांत झालं होतं.

IND vs AUS: अजिंक्य रहाणेचा मोठेपणा; पंचांना सांगून मॅच बॉल दिला मोहम्मद सिराजला

आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (३५) येथील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अतुल यांनी ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुढाकार घेऊन शिवशंभू पॅनेल उभारले. त्यांच्या पॅनलमधील ११ पैकी १० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. कायम गावकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या अतुल यांना स्वत:च्या पॅनलचा विजय मात्र यंदा पाहता आल नाही. त्यामुळे विजयाचा आनंद साजरा करायचा की अतुल नसल्याचे दु:ख अशी परिस्थिती गावकऱ्यांवर आणि पॅनलवर असल्याची दिसून आले.