08 March 2021

News Flash

मारिया शारापोव्हाची फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार

खांद्याच्या दुखापतीमधून शारापोव्हा सावरली नाही

दोन वेळा फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. काही दिवसांपूर्वी शारापोव्हाच्या खांद्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती, मात्र या दुखापतीमधून शारापोव्हा अजुनही सावरली नाहीये. अखेरीस तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.

“आयुष्यात योग्य निर्णय घेणं नेहमी सोपं नसतं. मी सरावाला सुरुवात केली आहे. हळूहळू खांद्याची दुखापत बरी होते आहे. पण पूर्णपणे सावरण्यासाठी मला थोडा अजून कालावधी लागेल.” शारापोव्हाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांना संदेश दिला.

काही वर्षांपूर्वी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली शारापोव्हा जानेवारी महिन्यापासून टेनिस खेळत नाहीये. त्यामुळे शारापोव्हा दुखापतीमधून सावरत मैदानात कधी पुनरागमन करतेय याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 1:37 pm

Web Title: maria sharapova withdraws from french open citing right shoulder
Next Stories
1 World Cup 2019 : संघासाठी विश्वचषक जिंकायचाय – डेल स्टेन
2 लोकेश राहुल विश्वचषकात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी योग्य पर्याय – गौतम गंभीर
3 World Cup 2019 : ‘त्या’ घटनेने खूप काही शिकवलं – विजय शंकर
Just Now!
X