News Flash

भारत दौऱयाआधी इंग्लंडला मोठा धक्का

इंग्लंडचा संघ भारताविरोधात पाच कसोटी सामने खेळणार आहे.

भारत दौऱयावर येण्याआधीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त झाल्याने तो भारत दौऱयाला मुकणार आहे. काऊंटी क्रिकेटमधील एका सामन्यादरम्यान मार्क वूडच्या घोट्याला दुखापत झाली. एका वर्षात वूडला तब्बल तिसऱयांदा घोट्याची दुखापत झाली आहे. याच दुखापतीमुळे वूडला बांगालदेश दौऱयातून देखील माघार पत्कारावी लागली. पण भारत दौऱयाआधी दुखापत बरी होईल, अशी वूड आणि संघ व्यवस्थापनाला आशा होती. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याची दुखापत बळावली.
वूडची संघातील अनुपस्थिती हा इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का आहे. इंग्लंडचा संघ भारताविरोधात पाच कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी क्रिकेटसाठी वूड हा इंग्लंडच्या संघासाठी खूप महत्त्वाचा गोलंदाज आहे. पाच कसोटी सामन्यांसोबतच इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने देखील खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 5:41 pm

Web Title: mark wood ruled out of englands tour of india with ankle injury
Next Stories
1 अश्विन पुन्हा अव्वल, रहाणेच्या क्रमवारीत सुधारणा
2 दिपा कर्माकर ‘बीएमडब्ल्यू’ परत करणार, देखभालीचा खर्च न परवडणारा!
3 फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवरून हरभजनच्या ट्विटला कोहलीचे प्रत्युत्तर
Just Now!
X