News Flash

मेरी कोमला वगळले

ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय बॉक्सिंग संघातून पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला वगळण्यात आले आहे.

| May 24, 2014 12:23 pm

ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय बॉक्सिंग संघातून पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला वगळण्यात आले आहे. तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणाऱ्या मेरी कोमला पतियाळा येथे नुकत्याच झालेल्या सराव शिबिरात अंतिम फेरीत पिंकी जांगरा (५१ किलो) हिने पराभूत केले होते. ‘‘ही लढत अटीतटीची झाली. आता राष्ट्रकुल स्पर्धेत पिंकीने पदक जिंकावे, यासाठी मी तिला शुभेच्छा देते,’’ असे मेरी कोम हिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 12:23 pm

Web Title: mary kom dropped from indian boxing squad for
टॅग : Mary Kom
Next Stories
1 जीवनची घोडदौड संपुष्टात
2 मुंबई इंडियन्सची दिल्लीवर १५ धावांनी मात; ‘अंतिम चार’मधील स्थानासाठी आशा कायम
3 फ्रेंच क्रांती घडणार?
Just Now!
X