News Flash

ओबामांच्या कौतुकामुळे मिल्खा सिंग, मेरी कोम भारावले!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या प्रशंसेमुळे माजी धावपटू मिल्खा सिंग व ‘सुपरमॉम’ बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम हे दोघेही खूप भारावून गेले.

| January 28, 2015 01:07 am

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या प्रशंसेमुळे माजी धावपटू मिल्खा सिंग व ‘सुपरमॉम’ बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम हे दोघेही खूप भारावून गेले.
सिरी फोर्ट सभागृहात झालेल्या समारंभात ओबामा यांनी आपल्या भाषणात मिल्खा सिंग हे आदर्श व्यक्तिमत्त्व असा उल्लेख केला होता. तसेच त्यांनी मेरी कोम ही या देशाला लाभलेली ‘सुपरमॉम’ असल्याचे सांगून तिने क्रीडाक्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले होते.

spt04‘‘माझे नाव ओबामा यांच्या लक्षात राहिले ही माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. ओबामा यांनी अतिशय संघर्ष करीत जगातील प्रतिष्ठेचे स्थान मिळविले आहे. त्यामुळे मलाही त्यांच्याविषयी खूप आदर आहे. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आपल्या देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे. ओबामा यांना भारतात प्रजासत्ताकदिनाचे मुख्य पाहुणे म्हणून आणण्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष अभिनंदन करतो.’’
-मिल्खा सिंग

spt05 ‘‘जगातील मोठय़ा राष्ट्राच्या प्रमुखांकडून माझे कौतुक होईल अशी मी कधी अपेक्षाही केली नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का आहे. जर मला कधी ओबामा यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली तर मी निश्चितच आभार मानणार आहे. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे मला भावी कारकीर्दीसाठी प्रेरणा मिळणार आहे. ओबामा यांना येथे आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानते. त्यांनीच माझी माहिती ओबामा यांना दिली असणार.’’               -मेरी कोम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2015 1:07 am

Web Title: mary kom milkha singh proud to be part of barack obama speech
टॅग : Mary Kom,Milkha Singh
Next Stories
1 राजीनामानाटय़!
2 एक डाव भुताचा..
3 स्टीव्हन स्मिथला अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार
Just Now!
X