भारताच्या एम. सी. मेरी कोम व एल. सरिता देवी यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळविले आणि पदक निश्चित केले. मेरी कोम या ३५ वर्षीय खेळाडूने ४८ किलो गटात रुमानियाच्या स्टेलुटा दुतो हिच्यावर मात केली. स्टेलुटा हिने चार वेळा युरोपियन स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. तसेच तिने तीन वेळा जागतिक स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली आहे. मेरी कोम हिने अव्वल दर्जाचा खेळ करीत तिला नमविले.

सरितादेवी हिने चीनची खेळाडू क्युई यावेन हिला हरविले आणि ६० किलो गटात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. तिने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत ही लढतजिंकली.

भारताच्या सीमा पुनिया, सावित्री बुरा, मीनाकुमारी देवी व भाग्यवती कचारी यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे.पुरुषांच्या ६४ किलो गटात मात्र भारताच्या धीरज रांगी याला पराभूत व्हावे लागले. त्याला लुईस कॉलीन रिचानरे याने नमविले.