News Flash

लेबनान स्फोट : हृदयद्रावक अन् धक्कादायक! विराटने व्यक्त केल्या भावना

दुहेरी स्फोटांच्या घटनेनंतर क्रिकेट विश्वातून मृतांना श्रद्धांजली

मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी असणाऱ्या बैरूट शहरामध्ये मंगळावारी संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरलं. या स्फोटांमध्ये शंभरहून जास्त जण ठार तर ४०००हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच स्फोटाची व्यापकता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. या महाभयंकर स्फोटांमुळे एकच हलकल्लोळ उडाला. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेवर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली ते अनुभवी महिला खेळाडू मिताली राज साऱ्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. विराटने, हृदयद्रावक आणि धक्कादायक अशा दोन शब्दात घटनेचं वर्णन करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. तर मिताली राजने या घटनेचं भयावह असं एका शब्दात वर्णने करत मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं.

दरम्यान, बैरुटमधील हे दोन महाभयंकर स्फोट १५ मिनिटांच्या फरकाने झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की संपूर्ण शहरातल्या घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरलं. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले. पण बैरुटमधल्या भारतीय दुतावासाने भारतीयांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुणीही घाबरुन जाऊ नये, जर कुणाला मदत हवी असेल तर हेल्पलाइन नंबरही देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 4:26 pm

Web Title: massive blast in beirut lebanon virat kohli mithali raj smriti mandhana cricket fraternity mourns devastating incident in lebanon vjb 91
Next Stories
1 आयर्लंडने मोडला टीम इंडियाचा विक्रम; इंग्लंडला दिला दणका
2 अयोध्या : राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर गौतम गंभीर म्हणतो…
3 लेबनान स्फोट : “२०२० साऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडतंय”
Just Now!
X