03 March 2021

News Flash

मॅच फिक्सिंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, ‘या’ देशाने घेतला कौतुकास्पद निर्णय

संसदेत विधेयक पास, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार

गेल्या काही महिन्यांमध्ये मॅच फिक्सिंगच्या वाढत्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी श्रीलंका सरकारने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. मॅच फिक्सिंग आणि यासंदर्भात येणाऱ्या सर्व व्यवहारांना कायद्याच्या कक्षेत आणत, लंकन सरकारने यासंदर्भात ३ महत्वाची विधेयकं पास केली आहेत. ‘Prevention of Offences related to sports’ या कायद्याअंतर्गत श्रीलंकेत मॅच फिक्सींग करणाऱ्या आरोपीला १० वर्षांची कैद होऊ शकते. ESPNCricinfo संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी लंकन संसदेत हे विधेयक सादर केलं असून, सध्या श्रीलंकेत कॅबिनेट मंत्री असलेल्या अर्जुन रणतुंगानेही याला आपला पाठींबा दर्शवला आहे. या विधेयकात खेळाडूंसोबत, संघाची गोपनिय माहिती बाहेर देणं, खेळपट्टीची माहिती जाहीर करणं या अंतर्गत क्युरेटर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही सहभागी करण्यात आलेलं आहे.

विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहर उमटेपर्यंत याचं कायद्यात रुपांतर होणार नाहीये. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पुढील १० दिवसांत या विधेयकाचं अधिकृतपणे कायद्यात रुपांतर होईल. काही महिन्यांपूर्वी, श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या, नुवान झोयसा यांच्यावर आयसीसीने फिक्सिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची बंदी घातली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 12:51 pm

Web Title: match fixing now a criminal offence in sri lanka psd 91
Next Stories
1 दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, इंदूर मध्ये सरावसत्राचं आयोजन
2 IND vs BAN : रोहितच्या ‘त्या’ शब्दांनी चहरला मिळाला हुरुप, घडवला इतिहास
3 Video : कसला निर्लज्ज माणूस आहेस रे ! चहल दीपक चहरला असं का म्हणाला असेल?
Just Now!
X