माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेत काळ्या मोहऱ्यांनिशी पहिल्याच सामन्यात खेळताना अर्मेनियाच्या लेव्हॉन अ‍ॅरोनियनला बरोबरीत रोखले. सलग दोन सामन्यांत बरोबरीचा निकाल लागल्याने आनंदच्या खात्यात एक गुण जमा झाले आहेत. एकूण नऊ फेऱ्यांच्या या स्पध्रेत आनंदचे सात सामने शिल्लक असून त्यापैकी चारमध्ये त्याला पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. तिसऱ्या फेरीत आनंदसमोर विश्वविजेता नॉव्रेचा मॅग्नस कार्लसनचे आव्हान आहे. आनंदच्या सामन्यासह पाच सामने बरोबरीत सुटल्याने स्पध्रेचा आजचा दिवस फारसा समाधानकारक नव्हता. हॉलंडचा अनिष गिरी आणि इंग्लंडचा मिचेल अ‍ॅडम्स यांच्यातील अनिर्णीत सामन्यात कडवा संघर्ष पाहायला मिळाला. कार्लसनला अर्मेनियाच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.
लंडन क्लासिक बुद्धिबळ