News Flash

रोममध्ये विल्यम्स भगिनीद्वंद्व!

रोममध्ये सुरू असलेल्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये विल्यम्स भगिनींचा आपापसात सामना होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इटालियन खुली टेनिस स्पर्धा

रोममध्ये सुरू असलेल्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये विल्यम्स भगिनींचा आपापसात सामना होणार आहे.

गेली दोन दशके टेनिसवर अधिराज्य गाजवलेल्या व्हिनस आणि सेरेना या दोघींनी आपापले पहिल्या फेरीचे सामने जिंकत आगेकूच केली असली तरी दुसऱ्याच फेरीत त्या आमनेसामने आल्यामुळे आता दोघींपैकी एकच आगेकूच करू शकणार आहे. दोन महिन्यानंतर पुनरागमन केलेल्या सेरेनाने पहिल्या फेरीतील लढतीत स्विडनच्या रिबेका पीटर्सनवर ६-२,६-४ अशी मात केली. तर बेल्जियमच्या एलीस मर्टन्सवर विजय मिळवण्यासाठी व्हिनसला ७-५, ३-६,७-६ असा संघर्ष करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 1:45 am

Web Title: match with williams sisters
Next Stories
1 सुवर्णकाळ परतणार?
2 विश्वचषक युद्धासाठी भारत शस्त्रसज्ज!
3 आयुष्यात नकारात्मकतेला स्थान नाही -धवन
Just Now!
X