मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धा

भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट हिने ५३ किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठत मॅट्टेओ पेलिकोन मानांकन कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या सुवर्णपदकासाठी सज्ज झाली आहे.

विनेशला शनिवारी चार लढतींपैकी दोन वेळा पुढे चाल देण्यात आली. अन्य दोन लढतींपैकी विनेशने नंदिनी साळुंखे आणि कॅनडाच्या समंता स्टीव्हर्ट यांच्यावर मात केली. कझाकस्तानच्या तात्याना अमानझोल आणि इक्वेडोरची लुइसा एलिझाबेथ यांनी विनेशविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली होती.

सरिता मोर आणि कुलदीप मलिक यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. सरिता हिला ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बल्गेरियाच्या गियुलिया पेनाल्बेर हिच्याकडून २-४ असे पराभूत व्हावे लागले. पुरुषांमध्ये कुलदीपला उपांत्य फेरीत रशियाच्या चिंगिझ लाबाझानोव्ह याने ९-१० असे हरवल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर गुरप्रीत सिंग आणि हरप्रीत सिंग याचे आव्हान पात्रता लढतीतच संपुष्टात आले.