News Flash

मुंबईच्या शालेय क्रिकेट संघांमध्ये १४ खेळाडूंचा समावेश

सचिनच्या प्रस्तावावर एमसीएचा निर्णय

मुंबईच्या शालेय क्रिकेट संघांमध्ये १४ खेळाडूंचा समावेश
मुंबई पोलीस जिमखाना आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात सचिन उपस्थित होता.

सचिनच्या प्रस्तावावर एमसीएचा निर्णय

जास्तीत जास्त शाळकरी मुलांना स्पर्धामध्ये संधी मिळावी, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) या स्तरावरील क्रिकेट स्पर्धामध्ये ठराविक अकराऐवजी १४ खेळाडू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने

हा प्रस्ताव एका कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी मांडला होता. त्यानुसार आतापासून हॅरिस आणि गाइल्स या शालेय स्पर्धामध्ये आता १४ खेळाडू खेळतील.

‘एमसीएने या प्रस्तावावर नुकताच सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी हॅरिस आणि गाइल्स स्पर्धामध्ये होईल,’ असे एमसीएचे संयुक्त सचिव पी.व्ही.शेट्टी यांनी सांगितले.

या प्रस्तावाला मुंबई शालेय क्रीडा संघटनेनेसुद्धा मान्यता दिली आहे, असे एमसीएमधील सूत्रांनी सांगितले. निवृत्तीनंतर एमसीएने सचिनचा सत्कार केला होता. या सोहळ्यामध्ये त्याने हा प्रस्ताव मांडला होता. यापूर्वी हरयाणामध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार अकरा जणांचाच संघ मैदानात उतरेल. पण फलंदाजी किंवा गोलंदाजी करताना तीन अतिरीक्त खेळाडूंची बदली करता येऊ शकते.

 

झारखंडचा महाराष्ट्रावर ६ विकेट्स राखून विजय

नवी दिल्ली : झारखंड संघाने अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रावर सहा विकेट्स राखून मात केली आणि यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात निर्णायक विजय मिळविला.

विजयासाठी ९३ धावांचे माफक आव्हान मिळालेल्या झारखंडने ४ बाद ५६ या धावसंख्येवरून डाव पुढे सुरू केला. उर्वरित ३७ धावांचा टप्पा विराट सिंग व आनंद सिंग या जोडीने सहज पार केला. विराटने ४ चौकारांसह नाबाद ३३ धावा, तर आनंदने नाबाद २५ धावा केल्या. या जोडीने ४८ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 3:13 am

Web Title: mca accepts tendulkars 14 side suggestion for school cricket
Next Stories
1 नवख्या अर्जेटिनाचा कोरियाकडून पाडाव
2 कर्णधार कोहलीचा ‘विराट’ विक्रम
3 Ind vs NZ: भारताचा डाव ५५७ धावांवर घोषित; किवींची सावध सुरुवात
Just Now!
X