News Flash

करोनाशी लढा : वैद्यकीय सुविधांसाठी गरज पडल्यास मैदान, MCA चं सरकारला ५० लाखांचं आर्थिक बळ

उच्चस्तरीय बैठकीत घेतला निर्णय

संपूर्ण देश करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी झुंजत असताना, देशातील क्रीडा संघटनाही सरकारीच मदत करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने करोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

“सध्याच्या परिस्थितीत करोनाविरुद्ध लढ्यात आम्हाला जे शक्य होईल ते करणार आहोत. महत्वाच्या काळात निर्णय घेण्याचे अधिकार संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर झाली…तर गरज पडल्यास आमच्या अखत्यारीत येणाऱ्या मैदानांवरही वैद्यकीय सुविधा पुरवण्याची तयारी MCA ने दाखवली आहे.” MCA चे सचिव संजय नाईक यांनी पत्रकारांना माहिती दिली.

अवश्य वाचा – करोनाविरुद्ध लढ्यात पी.व्ही.सिंधू उतरली; मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत

मुंबई आणि महाराष्ट्रातली करोना बाधित रुग्ण सापडत आहे. करोना बाधित रुग्णांचा आकडा आता शंभरीच्या पार गेला आहे. काही जणांना यामुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना सरकारला पाठबळ द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. देशातील इतर राज्यातही क्रीडापटू आपापल्या परिसरातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 3:52 pm

Web Title: mca to donate 50 lakh to maharashtra cm relief fund to fight against corona virus threat psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …तरीही मी IPL खेळणार – बेन स्टोक्स
2 मराठमोळ्या चंद्रकांत पंडितांचा विदर्भाला रामराम; मध्य प्रदेशच्या संघाला करणार मार्गदर्शन
3 करोनाविरुद्ध लढ्यात पी.व्ही.सिंधू उतरली; मुख्यमंत्री सहायता निधीला ५ लाखांची मदत
Just Now!
X