बीसीसीआयचे क्रीडा विकास व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी हे शुक्रवारी होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार असून विविध मुद्दय़ांवर एमसीएला प्रश्न विचारणार आहेत. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. ‘‘माझ्या मते, मी निवडणुकीला उभा राहू शकत नसलो तरी विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी पात्र आहे. आम्ही या निवडणुकीसाठी आमचा गट स्थापन केला आहे. विविध मुद्दे लोकांसमोर आणण्यासाठी माझ्या दृष्टीने ही सभा फारच महत्त्वाची आहे,’’ असे शेट्टी यांनी सांगितले.